मॅक्रोग्राफर्सच्या दुनियेचे अनोखे विश्‍व

मॅक्रोग्राफर्सच्या दुनियेचे अनोखे विश्‍व

पुणे : रंगबिरंगी फुलपाखरू असो वा फुलांवर बसलेली मधमाशी… छोटासा बेडूक असो वा मुंगी… त्यांच्या विश्‍वातील विविध पैलू व त्यातील सौंदर्य उलगडणाऱ्या “सूक्ष्म’ (मॅक्रो) फोटोग्राफीची वेगळी संकल्पना पुण्यात रुजविण्याचे काम “पुणे मॅक्रोग्राफर्स ग्रुप’ करत आहे. ज्या वस्तू किंवा जे कीटक डोळ्यांनी नीट पाहता येऊ शकत नाहीत, अशा छोट्या वस्तू आणि कीटकांचे विश्‍व टिपण्याचा या ग्रुपमधील छायाचित्रकार अनोखा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या छायाचित्रांना जागतिक स्तरामधील प्रदर्शनांमध्येही स्थान मिळत आहे. वन्यजीव छायाचित्रणापलीकडे खास सूक्ष्म छायाचित्रणासाठी 2014 मध्ये अन्वय नाकाडे आणि योगेंद्र जोशी या हौशी छायाचित्रकारांनी या ग्रुपची सुरवात केली. सध्या ग्रुपचे…

Read More

पहिला भारतीय ‘३६० अंश कॅमेरा’

पहिला भारतीय ‘३६० अंश कॅमेरा’

आपण स्वत: केलेलं संशोधन व त्यातून पुढे होणारी निर्मिती, त्या निर्मितीसाठी केलेली मेहनत, यातून मिळणारा आनंद हा कोणत्याही यशाच्या आनंदापेक्षा कमी नसतो. क्षितिज मारवाह या २७ वर्षीय मुंबईकर तरुणाने संशोधनाचा हा अनोखा आनंद अनुभवला, सोबत काही हुशार तरुणांना देखील घेतलं आणि त्यांनी निर्माण केला पहिलावहिला भारतीय बनावटीचा ३६० व्हर्च्युअल रिअॅलिटी कॅमेरा. कोणतंही अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे ते परदेशातूनच आलं असणार असा आपला एक साहजिक होणारा समज असतो. मात्र काही भारतीय संशोधक व निर्माते हे याला अपवाद ठरतात. गुगलच्या स्ट्रिट व्ह्यू कॅमेराला टक्कर देणारा व्हर्च्युअल रिअॅलिटी प्रकारातला कॅमेरा आणि तोही चक्क पूर्णपणे…

Read More

डॉ. विक्रम घाणेकर यांच्या ‘वाईल्ड फोटोग्राफी’ची आंतरराष्ट्रीय मॅगझीनकडून दखल

डॉ. विक्रम घाणेकर यांच्या ‘वाईल्ड फोटोग्राफी’ची आंतरराष्ट्रीय मॅगझीनकडून दखल

चिपळूण – आफ्रिका खंडातून प्रकाशित होणा-या ‘आफ्रिका जॉग्राफीक’ या आंतरराष्ट्रीय मॅगझीनमध्ये चिपळुणातील तरुण नामवंत कॅन्सरतज्ज्ञ डॉ. विक्रम रत्नाकर घाणेकर यांनी झिंबाब्वे येथील माना पूल्स नॅशनल पार्कमध्ये काढलेले छायाचित्र झळकले आहे. सायंकाळच्या सुमारास पाठमोरा चालणा-या डौलदार हत्तीमागे उडालेल्या बगळ्यांच्या थव्याचे अप्रतिम दृष्य डॉ. घाणेकर यांनी आपल्या कॅमेरात टिपले. या अफलातून, आकर्षक छायाचित्राला ‘आफ्रिका जॉग्राफीक’ने प्रसिद्धी देऊन डॉ. घाणेकर यांच्या ‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफी’चा सन्मान केला आहे. घनदाट जंगलातील वन्यप्राण्यांचे जीवन वन्यप्रेमींपर्यंत पोहोचविण्याचे काम हे मॅगझीन करते. डॉ. घाणेकर उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांनी एम. एस. जनरल सर्जन यासोबत मेंबर्स ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन ऑफ…

Read More

कॅमेरांच संग्रहालय

कॅमेरांच संग्रहालय

ज्यांना सिनेमाचे अन् ज्यांना फोटोचे वेड आवड आहे अशा चाहत्यांकरिता एक खूशखबर आहे, मात्र ही खूशखबर अनुभवण्याकरिता तुम्हाला पुण्यातील कोंडवा बुद्रुकमधील कॅमेरा संग्रहालयात जावे लागेल. या ठिकाणी गेलात तर तुमच्या माहितीत तर भर पडेलच शिवाय आजवर फक्त ऐकलेल्या कॅमेरांची इत्यंभूत माहिती, इतिहासही इथे जाणून घेत आपल्या माहितीत भर टाकता येईल. हे संग्रहालय साकारलंय भारत सरकारसाठी छायाचित्रकार म्हणून कार्यरत असणारे आता निवृत्त झालेले फरीद शेख यांनी. या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर फरीद शेख यांचा मुलगा झाकीर शेख अगदी आपुलकीने आणि तितक्याच तन्मयतेने आपल्याला माहिती देतो. या ठिकाणी पहिल्या भारतीय चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’…

Read More

खेळ छायाचित्रांचा

खेळ छायाचित्रांचा

हल्ली काही गोष्टी घेतल्याशिवाय आपण प्रवास सुरूच करत नाही. कॅमेरा ही त्यातलीच एक गोष्ट. कॅमेरा आणि प्रवास यांचं नातं अतूटच होऊन गेलंय. पण ते खरंच तसं आहे का? आपण एखाद्या छानशा पर्यटनस्थळी फिरायला गेलो आहोत. समोर रमणीय देखावा आहे. आपण तो पाहतोय, पण नीट आठवा.. काही सेकंदच किंवा मिनिटभर आपण तो आपल्या डोळ्यांनी पाहिलेला असतो. अनेकदा आपण तो कॅमे-याच्या डोळ्यांनीच बराच काळ पाहिलेला असतो. कॅमेरा ही आपल्या बहुतेकांच्या प्रवासातली एक आवश्यक गोष्ट असते बहुधा. तशी ती असायलाही काही हरकत नाही. काही जण व्यवसायाच्या निमित्ताने कॅमेरा घेऊन फिरतात आणि काही हौसेसाठी….

Read More

छायांकित वन्यजीवन!

छायांकित वन्यजीवन!

सुप्रसिद्ध छायाचित्रकार विक्रम पोतदार यांच्या जगभर प्रवासातील महत्त्वपूर्ण वन्यजीवनाचे छायांकित प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीमधील टेरेस आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार विक्रम पोतदार यांच्या जगभर प्रवासातील महत्त्वपूर्ण वन्यजीवनाचे छायांकित प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीमधील टेरेस आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन रसिकांना १३ जानेवारीपासूृन सुरू झाले असून, ते १९ जानेवारीपर्यत सुरू राहणार आहे. विक्रम पोतदार यांनी जगभरातील वन्यप्राणी, पक्षी व त्यांचे वास्तव्य अनोख्या शैलीत कॅमे-याद्वारे टिपली आहेत, त्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात विक्रम पोतदार यांनी रशिया, कॅनडा, कोस्टारिका, फिनलंड व आफ्रिका…

Read More

कॅमेराला द्या नवीन रूप

कॅमेराला द्या नवीन रूप

फोटोग्राफीची आवड असणारे अनेक तरुण-तरुणी आहेत. मोठमोठय़ा कंपनीचे महागडे डीएसएलआर कॅमेरा गळ्यात अडकवून मस्त टशनमध्ये कॉलेज कॅम्पस किंवा सार्वजनिक ठिकाणी मिरवण्यात वेगळा आनंद असतो. तुमच्या ईमेजमध्ये भर टाकणा-या या डीएसएलआरला तुम्ही आणखी हटके बनवू शकता. या कॅमेराच्या वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीज वापरून तुम्ही तुमचा कॅमेरा आणखी ट्रेंडी बनवू शकता. त्यामुळे कॅम्पसमध्ये तुमच्या या हटके कॅमेराची चर्चा होईल. कॅमेरा स्ट्रॅप्स कॅमे-याला हातातून निसटू नये यासाठी कॅमे-याला स्ट्रॅप्स असतात. त्यावर त्या त्या कंपनीचं नाव, लोगो असतो. पण हल्ली कॅमेरा अ‍ॅक्सेसरीजमध्ये या कंपनीच्या ओरिजनल स्ट्रॅप्सपेक्षा फंकी स्ट्रॅप ट्रेंडमध्ये आहेत. हिप्पी स्टाईल्स स्ट्रॅप्स, कार्टुन स्ट्रॅप्स, एथनिक…

Read More

फोटोग्राफर्सच्या प्रतिभांची कॅलेंडर्स..

फोटोग्राफर्सच्या प्रतिभांची कॅलेंडर्स..

कॅलेंडर हे आता केवळ दिनांक आणि वार दर्शविण्यासाठी भिंतीवर टांगण्याचं माध्यम राहिलेलं नाही. अलीकडे तर ते उत्तम फोटोग्राफीचं प्रदर्शन केंद्र होऊ पाहत आहे. कॅलेंडर आणि फोटोग्राफी विश्वाचं मिश्रण म्हणू हवं तर.. पण आता कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्या फोटोग्राफीचं प्रदर्शन करण्याकडे अनेक फोटोग्राफर्सचा कल वाढत आहे. या फोटोग्राफर्ससाठी त्यांच्या आकर्षक फोटो प्रदर्शनाशिवाय आता वर्षभर लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी ही कॅलेंडर्स चांगलीच ‘क्लिक’ होतील, यात शंका नाही. भिंतीवरील दिनदर्शिका आता तारीख-वार या संदर्भाच्या पलीकडे जाऊन जीवनशैलीचं दर्शन घडवणा-या थीम कॅलेंडरच्या स्वरूपात प्रत्येक महिन्यागणिक पलटत जाणा-या पानांतून झळकत आहे. अलीकडे तर ही कॅलेंडर्स उत्तम फोटोग्राफीचं…

Read More

भ्रमंतीतून जडली छायाचित्रणाची प्रीती!

भ्रमंतीतून जडली छायाचित्रणाची प्रीती!

ट्रेकिंगची आवड असणा-या प्रीती पटेल हिने तिच्या काही सहका-यांसोबत ‘ऑफ-बीट सह्याद्री’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून ती विविध गडकिल्ल्यांवर ट्रेक्स घेऊन जायची. ट्रेकिंगच्या आवडीतून प्रीतीला जडला छायाचित्रणाचा छंद. आज प्रीतीकडे गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीत लेन्समध्ये पकडलेल्या वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांचा निरनिराळया जाती-प्रजातींचा खजिना आहे. ‘सह्याद्रीच्या सख्या जीवलगा महाराष्ट्र देशा’ ह्या ओळींना अनुसरत सह्याद्रीच्या रांगांसह संपूर्ण महाराष्ट्राला पालथं घालणारी मुलुंड येथील प्रीती पटेल ही व्यावसायिक ट्रेकर आहे. ‘सह्याद्रीच्या घाटवाटा’ हा तिचा विशेष आवडीचा विषय. ‘फार्मसी या विषयात पीएच.डी. करत असताना सहा दिवस काम केल्यानंतर रविवारी बाहेर पडावंसं वाटायचं; पण मित्र-मैत्रिणींच्या वेळा जुळायच्या…

Read More

करिअर करा क्लिक

करिअर करा क्लिक

सध्या प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आणि मोबाइल आले आहेत. त्यामुळे फोटो काढून तो फेसबुकवर अपलोड करायचा आणि फोटोग्राफर म्हणून मिरवावं ही काही नवी गोष्ट राहिली नाही. फोटोग्राफीचा हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महागडे कॅमेरा घेता येणं शक्य नसल्यामुळे याआधी फोटोग्राफीच्या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार न करणारेही आता या क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत.कॅमे-याच्या रोलमधले ३६ फोटो पुरवून वापरायचे आणि रोल भरला की तो धुऊन येईपर्यंत वाट पाहायची. ते धुऊन आलेले फोटो जसे आहेत तसे आपले समजून घ्यायचे.. हा एक टप्पा होता फोटोग्राफी माध्यमातला. आधुनिक तंत्रज्ञानामुळे फोटोग्राफीला डिजिटल रूप केव्हाच प्राप्त झालं…

Read More